ऐन निवडणुकीत संजय राऊतांना धक्का ! निकटवर्तीयाची संपत्ती ईडीकडून जप्त
ऐन निवडणुकीत संजय राऊतांना धक्का ! निकटवर्तीयाची संपत्ती ईडीकडून जप्त
img
Dipali Ghadwaje
राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असतांनाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीकडून पत्राचाळ प्रकरणात घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्रास सुरू आहे. अशातच ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांची तब्बल ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

याआधीही ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्यात मोठी कारवाई करत संपत्ती जप्त करण्यात आली होती. आजच्या कारवाईनंतर या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ११६.२७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पीएमएलए 2002 च्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. या ठिकाणी प्रवीण राऊत यांच्या कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र या जागेवरील काही भाग त्यांनी खासगी बिल्डरांना विकल्याचा मोठा आरोप ईडीकडून लावण्यात आला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांना अटकही करण्यात आली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group