मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराची रेकी ; नेमकं काय प्रकरण?
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराची रेकी ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी केली असल्याचा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी केली असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली आहे. दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असण्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group