राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता. माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देतात का? हे लवकरच कळेल.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमयय्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
2022 सालचे हे प्रकरण असून यावर आता शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल दिला.