राज ठाकरेंचा राऊतांना टोला ; म्हणाले,
राज ठाकरेंचा राऊतांना टोला ; म्हणाले, "कावीळ झालेल्यांना..."
img
दैनिक भ्रमर
ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना जग पिवळं दिसतं, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांचे नाव न घेता केलेला आहे. राज ठाकरे यांनी महायूतीला पाठींबा जाहीर केला असून यासंदर्भात शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात महायूतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यावर संजय राऊतांनी टीका केली होती. याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मी आताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना जग पिवळं दिसतं. त्यामुळे ते आताच आतून बाहेर आले असल्याने त्यांचा तसा विचार असू शकतो," असा टोला त्यांनी लगावला.

सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ! कठोर कारवाईची मागणी

"काहीजण म्हणतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर धोरणांवरती टीका म्हणतात. त्यावेळी मी तशी टीका केली असून त्याच्या मोबदल्यात काहीही मागितलं नव्हतं. मला मुख्यमंत्रीपद हवंय, माझे ४० आमदार फोडले या गोष्टींसाठी ती टीका नव्हती तर मुद्दयांवर होती. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत झालेल्या चांगल्या गोष्टींचं मी स्वागतही केलं."
 
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते राम मंदिर उभं राहू शकलं नसतं. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी देणं मला आवश्यक वाटलं आणि तसा निर्णय मी घेतला. महाराष्ट्रासाठीच्या आमच्या काही मागण्यात त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन अशा अनेक गोष्टी आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आणि पुढे कसं जायचं यासंदर्भातली यादी येत्या एक दोन दिवसांत तयार होऊन त्यांच्यापर्यंत जाईल. त्यांना पुर्णपणे सहकार्य करण्याच्या सुचना मी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत," असेही ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group