संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले संजय राऊत......
संजय निरुपम यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले संजय राऊत......
img
Dipali Ghadwaje
मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग आहेत. राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली, असं म्हणत संजय निरुपम संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत निरुपम यांनी संजय राऊत, अमोल कीर्तीकरांसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून ठिणगी पडली आहे. अशातच मुंबईतील बहुतांशा जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्याने संजय निरुपम यांच्या काँग्रेसकडून लोकसभा लढण्याच्या सर्वा आशा मावळल्या होत्या. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरुपम काँग्रेस नेतृत्त्वासह उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली होती. यानंतर काँग्रेसने निरुपम यांचे पक्षातून निलंबन केले होते. आता संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. आज एक पत्रकार परिषद घेत मुंबईतील खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय निरुपम म्हणाले, संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी यामध्ये त्यांची मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावे लाच घेतली आहे. यामध्ये 29 मे 2020 मध्ये पहिल्यांदा राऊत यांच्या मुलीच्या खात्यावर 3 लाख 50 हजार रूपये आले. यानंतर 26 जून 2020 मध्ये 5 लाखांचे आणि पुढे 7ऑगस्ट 2020 मध्ये 1 लाख 25 हजारांचे पेमेंट आल्याचे आरोप निरुपम यांनी केले आहेत.

माजी काँग्रेस नेते संजय निरुपम पुढे म्हणाले, "आज ईडीने उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावले आहे. खिचडी चोरांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत आहेत. आणि त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि साथीदाराच्या नावावर पैसे घेतले आहेत."

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group