४ जुलै २०२४
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भोलेबाबांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंतर संपू्र्ण भारतात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
“पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा”
“या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. भोंदूगिरी तिथूनच सुरु होते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तर मग तसेच वागा ना. गुहेत जाऊन तपस्या करुन स्वत:ला बाबा महाराज म्हणून घ्याल. तुम्ही स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल. मी बायोलॉजिकल पद्धतीने जन्माला आलो नाही. देशाच्या पंतप्रधानालाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
80 हजार लोकांना परवानगी असताना अडीच लाख लोक तिथे कशी जमली. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत. त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात, असेही संजय राऊत म्हणाले.
Copyright ©2024 Bhramar