विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पूर्ण झालं असून पराभवाचा झटका बसणारा तो १२ वा उमेदवार कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत निवडणुकीच्या रिंगणात ?
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): शिवाजीराव गर्जे,राजेश विटेकर
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : कृपाल तुमाने,भावना गवळी
काँग्रेस : प्रज्ञा सातव
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : मिलिंद नार्वेकर
शेकाप (शरद पवार गटाचे समर्थन) : जयंत पाटील
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १४ अर्ज दाखल करण्यात आले होते, मात्र २ अर्ज बाद झाले. त्यामुळे ११ जागांसाठी १२ उमेदवार आहेत. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार आहेत.
विधानसभेत सध्या २८८ पैकी 274 आमदारांचं संख्याबळ आहे. यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या 23 मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे सध्या २०० आमदारांचं संख्याबळ असून विधान परिषदेसाठी ९ उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडे ६५ आमदारांचं संख्याबळ असून ३ उमेदवार दिले आहेत.