छगन भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? संजय राऊत म्हणाले....
छगन भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? संजय राऊत म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

काय म्हणाले खासदार संजय राऊत?

छगन भुजबळ आणि शिवसेनेचा आता कोणताही संबंध नाही. छगन भुजबळ आणि शिवसेनेत बोलणी सुरु आहेत, अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.   

दरम्यान यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले. छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ उलटला. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे. त्यांच्या आताच्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खाणार नाहीत. ते शिवसेनेत येणार अशा बातम्या उडवून महाराष्ट्रात गोंधळ उडवला जात आहे. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, भेटणारही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group