‘सामना’वाल्यांनी आमची काळजी करायची गरज नाही” असं संजय गायकवाड म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याचा सामनातून आरोप करण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते.
दरम्यान फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांवर पाळत ठेवायची, फोन टॅप करायची काही आवश्यकता नाही. सगळे निर्णय घेताना दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेतात. आमचं सरकार हे महायुतीचे सरकार असून एका विचाराचे सरकार आहे.
त्यामुळे सामनाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. एकनाथ शिंदे यांना भाजपपासून दूर कसे करता येईल, त्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. पण एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेबांच्या विचारानुसार हिंदुत्वाच्या विचारानुसार भाजपासोबत आम्ही लोक गेलेलो आहोत. त्यामुळे हे कधीच वेगळे होणार नाहीत.
“आमच्या शिवसेनेत कुठलेही गट बीट पडत नाहीत. आमचा नेता खंबीर आहे. सगळे आमदार आम्ही एका जीवाचे आहोत. आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही” असं संजय गायकवाड यांनी ठणकावून सांगितलं.
मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. आता संजय गायकवाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जर सकारात्मक पाऊल दोन्हीकडून पडत असेल तर हा विचार चुकीचा आहे असं वाटत नाही. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचे लोक एकत्र काम करत असतील तर चांगला विचार आहे” असं संजय गायकवाड म्हणाले.
“राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसते आणि कायमचा मित्र नसतो. कालचा शत्रू उद्याचा मित्र आणि उद्याचा मित्र कालचा शत्रू, हे सगळं समीकरण असते. कधी आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावे लागेल. उद्या ते सोबत आले तर त्यांचं गुणगान गावे लागते, हे राजकारण आहे” असं संजय गायकवाड बोलले.