मतदानाच्या दिवशीही गोंधळ! डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरे गटाचे  कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मतदानाच्या दिवशीही गोंधळ! डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची मतदान होत आहे. मुंबईत सहा जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन करत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. भांडूप येथील मतदानकेंद्रावर हा प्रकार घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार , याप्रकरणी संजय राऊत यांनी पोलिसांना जाब विचारला आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आणि सुनिल राऊत मतदानासाठी बाहेर पडले, यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाल्याचे पाहून संजय राऊत संतापले.

यावेळी सुनील राऊत यांनी देखील पोलिसांना जाब विचारला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत बसवले आहे. आमचे कार्यकर्ते १०० मीटरच्या बाहेर होते. आमच्या टेबलवर मार्गदर्शन करत होते. ही दडपशाही सुरु आहे. या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही. भाजपला माहिती आहे ते जिंकणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा वापर करुन दबाव निर्माण केल्या जात आहे, असे सुनिल राऊत यांनी सांगितले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group