मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र 'या' क्रमांकावर
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र 'या' क्रमांकावर
img
दैनिक भ्रमर
आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. एकीकडे निवडणुका जाहीर झाल्यानंतर अयोग्य गोष्टींबाबत तक्रार देखील केली जाते. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रारींचे तातडीने निवारण केले जात आहे.  यावर आतापर्यंत महाराष्ट्रातील मतदारांकडून १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ८१८, मुंबई उपनगरातून २ हजार ३३१ आणि ठाण्यातून २ हजार १८३ तक्रारी आलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे ३४ तक्रारी आलेल्या आहेत.  तक्रारींचे निवारण करण्यात नागालँड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाची विविध अॅप्स, मतदार यादी, मतदान स्लिप, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे.

चीनला झटका! इराण नंतर भारताच्या हाती आणखी एक विदेशी बंदर

सर्वाधिक तक्रारी कोणत्या? 

– सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे.

– मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल १ हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत.

– ई- मतदार ओळखपत्राविषयी १०४७ तक्रारी आहेत

– नवे ओळखपत्र मिळवण्याबाबतचा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

– मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group