उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. येथील ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात, डोंगरावरून आलेल्या आलेल्या महाप्रलयात अवघ्या 34 सेकंदात एक संपूर्ण गाव वाहून गेले.
उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील11, सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि इतर जिल्ह्यांतील 36 अशा एकूण 51 पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी
* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
* राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१