आत्ताची एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे लँडिंग करताना हेलिकॉप्टर कोसळलं. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये किती व्यक्ती होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये उतरताना भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरचे नुकसान झाले होते. या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यासाठी लष्कराने दुसरे एक हेलिकॉप्टर आले. नादुरुस्त असलेल्या हेलिकॉप्टरला घेऊन सदरील हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण भरले. मात्र, त्याचवेळी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने पुन्हा लँडिंगचा निर्णय घेतला.
मात्र, लँडिंग करण्याआधीच हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटली. त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर आकाशात गरागरा फिरले आणि धाडकन जमिनीवर कोसळले. या अपघातात कोणी जखमी झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.