उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्या गाडीला रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातात हरीश रावत थोडक्यात बचावले, त्यांना किरकोळ दुखापत झाली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते हरीश रावत हे ओव्हरटेक करत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकली. हल्दवानी वरून काशीपूरकडे जात असताना बुधवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास ही घटना घडली.
हरीश रावत यांच्यावर सध्या काशिपूरच्या केवीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आहेत. रावत यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाहनातील चालक आणि गनर देखील थोडक्यात बचावले आहेत.
माजी मुख्यमंत्री हरीश रावत हल्दवानीहून काशीपूरला त्यांच्या फॉर्च्युन कारने जात होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांची कार दुभाजकाला धडकली. गाडी वेगात असल्याने कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने रावत यांना सीएचसीमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना पाठवलं.
सीओ भूपेंद्र सिंह भंडारी यांनी माजी मुख्यमंत्री रावत यांना त्यांच्या कारमधून काशीपूर येथील केव्हीआर रुग्णालयात नेले. उपचारानंतर माजी मुख्यमंत्री रावत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.