२५ हजारांत मुली मिळतात, भाजप महिला मंत्र्याच्या पतीचे वादग्रस्त विधान
२५ हजारांत मुली मिळतात, भाजप महिला मंत्र्याच्या पतीचे वादग्रस्त विधान
img
वैष्णवी सांगळे
राजकीय नेत्यांचे राजकीय भाषणे त्यातील वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरले आहे. हे वादग्रस्त विधाने विरोधातील राजकीय व्यक्तीविषयी, सर्वसामान्यांविषयी आणि महिलांविषयी देखील अत्यंत खालील पातळीत बोलली जातात. उत्तराखंडमधील महिला सक्षमीकरण आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 



सोमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शीतलाखेत मंडळात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गिरधारी लाल साहू एका अविवाहित कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना दिसत आहेत.

या व्हिडिओत त्यांनी “मुलींची काहीच कमतरता नाही” तसेच “बिहारमध्ये २० ते २५ हजार रुपयांत लग्नासाठी मुली मिळतात” असे विधान केल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वातावरण तापले. काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया देत याला महिलांचा अपमान म्हटले आहे.

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ज्योती रौतेला यांनी हे वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे असल्याचे सांगत महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. मंत्री आणि त्यांच्या पतींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्या पतीने असे विधान करणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे

दरम्यान, गिरधारी लाल साहू यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झालेले आहेत. एका मर्डर प्रकरणात त्यांचे नाव चर्चेत होते. तसेच, एका नोकराची फसवणूक करून त्याची किडनी काढून घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group