बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ मंदिर काही महिन्यापून बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता केदारनाथ धामाचे दरवाजे भाविकांसाठी विधिवत उघडण्यात आले असून ‘हर हर महादेव’च्या गजरात वातावरण दुमदुमून गेले. मंदिर उघडण्याच्या या पवित्र क्षणी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करत भाविकांचे भव्य स्वागत करण्यात आले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनत्रीचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर आता भाविकांसाठी केदारनाथचे ही दरवाजे खूले करण्यात आल्याने चारधाम यात्रेला खऱ्या आर्थाने आता वेग आला आहे. कसा होता सोहळा? उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पाहाटे पासूनच हजारो भविकांनी केदारनाथ मंदिराजवळ गर्दी केली होती. जसे मंदिराचे दरवाजे उघडले, तसा संपुर्ण परिसर 'हर हर महादेव' आणि जय केदारनाथच्या जयघोषाने दूमदूमून गेला. मंदिरात फुलांची आर्षक सजावट करण्यात आली आसून संपूर्ण परिसरातील वातावरण आध्यात्मीक ऊर्जेने भरले आहे.
चार धाम कधी उघण्याात आले
यमूनोत्री-१९ एप्रिल २०२६
गंगोत्री-१९ एप्रिल २०२६
केदारनाथ २२ एप्रिल २०२६ (सकाळी ८:०० वाजता)
बद्रिनाथ २३ एप्रिल २०२६ (पहाटे ६:१५वाजता)
भाविकासाठी महत्त्वाच्या सुचना आणि नियम-
१ नोदनी अनिवार्य: यात्रेला जाण्यापूर्वी भाविकांना उत्तराखंड सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदनी करणे बंधणकार आहे.
२ वैद्यकीय तपासणी: ज्या भाविकांचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त आहे, त्याच्यासाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
३ हवामान: डोगराळ भागात वातावरण कधीही बदलू शकते त्यामुळे प्रवाश्यांनी सोबत उबदार कपडे कपडे आणि रेनकोट ठेवणे अवश्यक आहे. धार्मिक महत्व- मंदाकिनी नदिच्या काठी वसलेले केदारनाथ धाम हे मोक्षप्राप्तीचे द्वार मानले जाते. हिंदू मान्यतेनूसार, या पवित्र धामाची यात्रा केल्यास मानवाच्या सर्व पापांचा नाश होतो. आणि अध्यात्मीक शांती मिळते. आता इथून पुढचे सहा महिने भाविकांना या पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे.
केदारनाथ यात्रेसाठी आतापर्यंत सात लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते व पदपथांची सुधारणा आणि बर्फ हटवण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. तीर्थक्षेत्रात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) मंदिर परिसरात मोबाईल फोनला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. असे करताना आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.