आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानी येथे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी उत्तरकाशीच्या गंगनानी वरून येत असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर एका प्रायव्हेट कंपनीचे होते. या हेलिकॉप्टरमधून ७ भाविक प्रवास करत होते. अचानक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि जंगलात पडले. या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. तर इतर जणांचा शोध सुरू आहे.
सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत आहे. केदारनाथ, बदरीनाथ आणि गंगोत्री-यमुनोत्री या ठिकाणी दर्शनसाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. काही भाविक पायी चालत जात आहेत तर काही हेलिकॉप्टरने देवस्थानाच्या ठिकाणी जात आहेत.