केदारनाथमध्ये एअर एम्बुलन्सचं क्रॅश लॅण्डिंग ; नेमकं काय घडलं?
केदारनाथमध्ये एअर एम्बुलन्सचं क्रॅश लॅण्डिंग ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
केदारनाथ : सतत बदलणाऱ्या हवामानादरम्यान ऋषिकेश इथे हेलिकॉप्टरचं लॅण्डिंग क्रॅश झालं. थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे. या दुर्घटनेदरम्यान हेलिकॉप्टरचं नुकसान झालं. मात्र प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

एआयआयएमएस ऋषिकेशच्या हेलि ॲम्ब्युलन्स सेवेचे एक हेलिकॉप्टर आज केदारनाथमध्ये क्रॅश लॅण्डिंग झालं. हेलिकॉप्टरच्या मागील भागाला झालेल्या नुकसानीमुळे हे क्रॅश-लँडिंग झाले. सुदैवाने, हेलिकॉप्टरमधील सर्व पाच प्रवासी सुरक्षित आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने केदारनाथजवळ उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मागील भागाला काहीतरी अडथळा आल्याने नुकसान झाले आणि त्यामुळे ते आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले.

हेलिकॉप्टरमधील पायलट आणि इतर चार प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

हेलिकॉप्टरच्या मागील भागाला नेमके कशामुळे नुकसान झाले, याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. हवामानाची स्थिती किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कशामुळे अपघात झाला, हे तपासानंतर स्पष्ट होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group