गेल्या 10 मे पासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. तेव्हा पासून भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे. चार धाम पैकी एक असणाऱ्या केदारनाथ धाम येथे दररोज 25 हजाराहून अधिक यात्रेकरू भाविक केदारनाथ धामला दाखल होत आहेत. अशातच उत्तराखंडमधील केदारनाथ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ येथील दुर्घटनेतील या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून हेलिकॉप्टरमधील 7 जण थोडक्यात बचावले आहेत.