अलीकडेच 24 जुलै रोजी नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हेलिकॉप्टर कोसळल्याने पुन्हा अपघात झालाय. नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रसुवाला येथे जात असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये चार चिनी नागरिकांचाही सहभाग होता. नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर होते. पण विमानातील सर्व ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्रानेएका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार , हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते. पण रस्त्यातच ते क्रॅश झाले.
शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी दुपारी हे हेलिकॉप्टर कोसळलाची माहिती पुढे आली आहे. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्ते डीआयजी दान बहादूर कार्की यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.