केदारनाथ मार्गावर दरड कोसळल्याने महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू
केदारनाथ मार्गावर दरड कोसळल्याने महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी ७ वाजेच्या मोठी दुर्घटना घडली आहे. चिरबासाजवळ दरड कोसळली असून त्यात तीन यात्रेकरुंचा मृ्त्यू झाला आहे. ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (वय ३१, रा. नागपूर), सुनील महादेव काळे (वय २४, रा. जालना), अनुराग बिष्ट, (रा. तिलवाडा रुद्रप्रयाग) यांचा समावेश आहे.

गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. 

या घटनेप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी शोक व्यक्त केला आहे.  यासंदर्भात ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, पहाडी भागात दरड कोसळल्याने काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी दु:खद आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याचे निर्दश देण्यात आले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची देव शक्ती देवो.

इतर बातम्या
Join Whatsapp Group