सकल मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही : विजय काकडे पाटील
सकल मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही : विजय काकडे पाटील
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा समाजाचे सर्वेसर्वां मनोज जरांगे पाटील यांचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. संभाजी नगर येथून आलेले मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक विजय काकडे पाटील यांनी नाशिक येथे तातडीची पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला.

आज (दि.१६) सकाळी मराठा समाजाच्या नावाने पत्रकार परिषद आयोजित करून नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांना काही समाज बांधवांनी पाठिंबा जाहीर केला.

जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी सुपारी असल्याचा संशय विजय काकडे यांनी व्यक्त केला. यावेळी विजय काकडे व गणेश उगले पाटील, नाशिकचे विलास पांगारकर, अमित जाधव, संदीप लभडे, विलास जाधव उपस्थित होते.

कोणालाही विश्वासात न घेता परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्या लोकांचा समाचार घेण्यासाठी आपल्याला पाठविले असल्याचे काकडे व उगले यांनी सांगितले. या दरम्यान दूरध्वनीद्वारे जरांगे पाटील यांच्याशी बोलून आपली भूमिका पत्रकारांना सांगितली.

मध्ये ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यांना मी ओळखत नसून आमचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचा खुलासा जरांगे पाटील यांनी यावेळी दूरध्वनीवरून बोलताना केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group