मराठा बांधवांनो! आपापल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, मनोज जरांगेंचं आवाहन
मराठा बांधवांनो! आपापल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, मनोज जरांगेंचं आवाहन
img
Dipali Ghadwaje
सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अधिसूचनेचे रूपांतर करावं असं आवाहन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे झालेल्या सभेत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने सग्या-सोयऱ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासंबंधी अध्यादेश काढला आहे. 

याबरोबरच शिंदे समितीचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. तो स्वीकारावा याबरोबरच अध्यादेशाच कायद्यात रूपांतर करावं हे सर्व करण्यासाठी विधिमंडळाच अधिवेशन गरजेचं आहे, 15 तारखेला अधिवेशन होत आहे, या आधीच विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली आहे.

दरम्यान मराठा बांधवानी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. यामागे आमची भूमिका नसून सर्व आमदारांनी कायद्याच्या बाजूने बोलावं यासाठी आग्रह असणार आहे, मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभा रहावं असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

10 फेब्रुवारीपासून कठोर आमरण उपोषण करणार
मराठा आरक्षणाबाबत  सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, जरांगे यांची फसवणूक झाल्याची टीका सोशल मीडियामधून होत असल्याने आता जरांगे संतापले असून, त्यांनी टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला होता. माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. सोबतच 10 फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group