मनोज पाटील यांच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मोठा लढा देत आहेत. आरक्षणाबाबत सध्या गावागावात त्यांचे दौरे सुरू आहेत. अशातच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील सध्या धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकणी येथे भाषण करत होते. भाषण करता करता अचानक ते स्टेजवर बसले.
यावेळी त्यांनी स्टेजवर बसून भाषण केलं. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जरांगे आता दौरा सोडून आराम करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.