जगाला बॉम्बस्फोटाने हैराण करून सोडणाऱ्या पाकिस्तानातच बॉम्बस्फोट झालाय. पाकिस्तानच्या पेशावर मध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. गुरूवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला असून यात ९ जणांचा मृत्यू झालाय. तर ४ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्बस्फोट पोलिसांच्या मोबाईल व्हॅनच्या मार्गावर करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी पोलिसांनी लक्ष्य केले होते. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटानंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम पुरावे गाळा करत आहे.
मंगळवारी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबर रोजी फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ ही घटना घडली होती. यामध्ये ३२ जण जखमी झाले. ही बॉम्बस्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतचे वातावरण होते. अनेक घरांच्या काचाही फुटल्या होत्या.