नमाज पठणादरम्यान मशिदीजवळ मोठा बॉम्ब स्फोट, २४ जणांचा मृत्यू
नमाज पठणादरम्यान मशिदीजवळ मोठा बॉम्ब स्फोट, २४ जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. शुक्रवारच्या नमाजावेळी इस्लामाबादच्या कासर-ए-खदिजातुल कुबरा शिया मशिदीत आत्मघातकी स्फोट झाला आहे. ज्यात अनेक लोक मारले गेलेत. या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये इमरजेंसी लागू करण्यात आली आहे. एका व्यक्तीने मशि‍दीच्या गेटवर येऊन स्वत:ला बॉम्बने उडवल्याची माहिती काही रिपोर्टमधून समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेल्या मस्जिदमध्ये नागरिक नमाजाचे पठण करत होते. त्याचवेळी एक मोठा स्फोट झाला. आंतराष्ट्रीय मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लास्टमध्ये शिया मस्जिदला टार्गेट केलेय. पण पोलिसांनी हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

या भीषण बॉम्ब स्फोटचे आता व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. यामध्ये दिसत आहे की मस्जिदचा एक भाग पूर्णपणे ढासळला असून चारही बाजूने मृतांच्या शरीराचे तुकडे पडले आहे.या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group