पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! अफगाणिस्तानच्या रुग्णालयावर एअरस्ट्राईक; ४०० जणांनी जीव गमावला
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! अफगाणिस्तानच्या रुग्णालयावर एअरस्ट्राईक; ४०० जणांनी जीव गमावला
img
वैष्णवी सांगळे
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सोमवारी उशिरा पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये केलेल्या भीषण एअरस्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या रुग्णालयावर हल्ला केला आहे. दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. यामध्ये ४०० विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आमि रहिवाशी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानी लष्कराने काबूलमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ला केला. यामध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे, संरक्षण मंत्रालय आणि GDI मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते. तसेच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागांतूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते.

दरम्यान,  रुग्णालय आणि रहिवाशी भागत हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला. हा दावा खोटा असून, जनमताची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये अफगाण तालिबानच्या लष्करी तळांना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पायाभूत सुविधांना अचूकपणे लक्ष्य करण्यात आले, ज्यात तांत्रिक उपकरणे आणि दारूगोळ्याच्या गोदामांचा समावेश होता. या ठिकाणांचा वापर निष्पाप पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केला जात होता, असंही पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group