पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; कोणी काढला अजब फतवा ?
पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; कोणी काढला अजब फतवा ?
img
वैष्णवी सांगळे
अफगाणिस्तानमध्ये ज्या कायद्यावर सही झाली आहे तो कायदा संतापजनक आहे. असा की तुमच्याही पायाखालची जामी सरकेल. तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यापासून महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या तालिबानने आता क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 

तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी एका नवीन फौजदारी दंड संहितेवर स्वाक्षरी केली असून पत्नी आणि मुलांना मारहाण करा, पण हाडे मोडू नका आणि खुणा दिसू देऊ नका, असा धक्कादायक मेसेज या कायद्यातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कायद्यावर साधी चर्चा करणेही तालिबानने गुन्हा ठरवले आहे.  

पतीने पत्नीला मारहाण केल्यास, जोपर्यंत शरीरावर जखमा किंवा हाडे तुटल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो गुन्हा मानला जाणार नाही. हिंसाचार सिद्ध झालाच, तर पतीला जास्तीत जास्त केवळ १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. पीडित महिलेला तिचे शरीर पूर्णपणे झाकूनच न्यायाधीशांसमोर उपस्थित राहावे लागेल. विशेष म्हणजे, तक्रार करताना तिचा पती किंवा पालक सोबत असणे अनिवार्य आहे, ज्यामुळे दहशतीखाली असलेल्या महिलांना तक्रार करणे अशक्य होऊ शकते. याशिवाय, पत्नीने पतीच्या परवानगीशिवाय नातेवाईकांची भेट घेतल्यास तिला ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

कायद्याच्या कलम ९ नुसार, अफगाण समाजाची वर्गवारी करण्यात आली असून शिक्षा ही गुन्ह्यापेक्षा सामाजिक दर्जावर अवलंबून असेल.
धार्मिक विद्वान (उलेमा): गुन्हा केल्यास केवळ ताकीद दिली जाईल.
उच्च वर्ग (अशरफ): केवळ न्यायालयात बोलावून समुपदेशन केले जाईल.
मध्यम वर्ग: तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल.
कनिष्ठ वर्ग: तुरुंगवासासोबतच कठोर शारीरिक शिक्षा दिली जाईल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group