पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ चे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणीत वाढ झालीय. पाकिस्तानच्या न्यायालयाने सिफर प्रकरणात इमरान खान आणि त्याच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्र्याला १० वर्षाची शिक्षा सुनावलीय. गोपनीयता उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालायाने माजी पंतप्रधान इमरान खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावलीय.
इमरान खानसह माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही स्टेट सीक्रेट उघड केल्याप्रकरणी १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी आणि पीटीआयच्या प्रवक्त्याने सरकारी दस्तऐवज लीक केल्याप्रकरणी दोघांना शिक्षा सुनवण्यात आल्याची पुष्टी केलीय.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका मानला जातो आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.