नांदुरमध्यमेश्वरच्या उर्वरित १० गेटच्या  कामांना  अंतिम मंजूरी
नांदुरमध्यमेश्वरच्या उर्वरित १० गेटच्या कामांना अंतिम मंजूरी
img
दैनिक भ्रमर
निफाड  :  निफाडचे आमदार दिलीप  बनकर यांच्या प्रयत्नांना यश आले असुन नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटच्या कामास अंतिम मंजुरी मिळाली असून धरणाच्या १० गेटचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे, 

नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष अधिवेशनामध्ये जलसंपदा मंत्र्यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटच्या कामांना मंजुरी देऊन निधी वितरित केला आहे.  दरवर्षी पुराच्या तडक्यातून गोदाकाठ भागातील सुमारे १७ गावांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आमदार दिलीप काका बनकर यांनी तत्कालीन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांना समक्ष धरणावर आणून होणाऱ्या नुकसानीची पाहणी निदर्शनास आणून दिली होती. 

त्या अनुषंगाने तेव्हाच तत्कालीन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी तत्वतः मंजुरी दिली होती परंतु आता धरणाचे काम त्वरित साकारण्यासाठी आमदार दिलीप काका बनकर यांनी विधानसभेत आवाज उठवून कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यासाठी निधीची तरतूद करून घेतली असल्याने काम लवकरच पूर्णत्वास जाईल, 

त्यामुळे गोदाकाठ वाशीयांचा दरवर्षीचा पुराचा प्रश्न मिटल्याने गोदाकाठ भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत, तरी या अनुषंगाने आज दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता आमदार दिलीप काका बनकर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान गोदाकाठ वाशीयांनी धरणावर उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group