टोमॅटोचे दर कोसळल्याने निफाडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन
टोमॅटोचे दर कोसळल्याने निफाडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन
img
Dipali Ghadwaje
नाशिक प्रतिनिधी: टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. शनिवारी निफाड येथे आवक हा ४० पैसे किलो दर मिळाल्याने चांगला भाव मिलालवा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टोमॅटोला भाव मिळावा यासह केंद्र सरकारने धोरण बदलावे या मागणीसाठी म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत हल्लाबोल केला.

मागील काही दिवसांपासून सातत्याने टोमॅटोचे दर हे कोसळत आहे त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झालेला आहे असे असताना केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 40 पैसे प्रति किलो प्रमाणे टोमॅटो विकावा लागत आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी  शनिवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात निफाड येथे संतप्त शेतकरी एकत्र झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर  टोमॅटो फेकून केंद्र सरकारच्या नीतीचा निषेध केला. 

यावेळी घोषणाबाजी करून टोमॅटोला भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी केली आहे सरकारने नीती बदलावी अशा स्वरूपाची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान या सर्व प्रश्नांवर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले की केंद्र सरकारची आयात आणि निर्यात धोरणाची धरसोड वृत्ती या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे.  त्यामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारने आपली धोरण बदलावी म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे करत केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group