निफाड : मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा झाल्यामुळे त्यात शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्गासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई खूप कमी असल्याने. या बाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आज ५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता निफाड त्रिफुली येथे शेतकरी बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे . विज बिल माफी झालीच पाहिजे.आदी घोषणा देत शेतकऱ्यांनी निफाड त्रिफुली वर रास्ता रोको केला.
यावेळी निफाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पा कुंदे म्हणाले की निफाड तालुक्यातील काही गावांचे या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जास्त द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळत असलेले भरपाई ही खूप कमी असून त्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघणार नाही, सोसायटी व बँकेचे कर्ज भरणे शक्य होणार नाही तरी शासनाने दिलेल्या नुकसान भरपाईत वाढ करावी, सोसायटीचे व बँकेचे कर्ज माफ करावे, शेतीसाठी असलेले वीज बिल माफ करावे ,चालू कर्ज माफ करून नवीन पीक कर्ज तात्काळ देण्यात यावे, झालेले नुकसान हे खूप मोठे असून शासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकरी वर्गास मदत करावी.अशी मागणी केली.
यावेळी संपत व्यवहारे ,हरिचंद्र भवर, रावसाहेब गोळे ,शिवाजी राजे ढेपले.जानकीराम धारराव.निवृत्ती भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी नायब तहसीलदार सुजाता वायाळ यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी रमेश जाधव, , नितीन कापसे, अंबादास गोळे ,साहेबराव कापसे, धनंजय कापसे, एकनाथ निकम,संजय जाधव, बाबुराव वाढवणे, संजय पाटोळे.लहानु बोरगुडे,नंदकुमार कापसे, सुभाष गाजरे, सुरज कुंदे , महेश जाधव ,बापू कापसे, नारायण कुंदे, निवृत्ती भोसले, शरद ढेपले, सागर कुंदे, प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष सागर निकाळे. देवदत्त कापसे,व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, विश्वनाथ निकम, तसेच पोलीस सागर घोलप ,मच्छिंद्र खरात ,भारत पवार, विक्रम लहाने ,राजू मनोहर, विकास जाधव , विलास बिडगर , कल्पना पवार आदी उपस्थित होते .