नाशिक । वडनेर दुमाला परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकांनी सतर्क रहावे
नाशिक । वडनेर दुमाला परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकांनी सतर्क रहावे
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नुकतीच मनाला चटका लावणारी  धक्कादायक घटना वडनेर दुमाला येथील घडली. वडनेर दुमाला येथे ४ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ताजी असतानाच वडनेर दुमाला येथे पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. 

शिक्षकाने अपशब्द वापरल्याने विद्यार्थ्यांचा टोकाचा निर्णय, शिक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी सुसाईड नोट

सोमवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास  नितीन गोरे हे आपल्या स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनातून नाशिकवरून घरी परतत असताना पाथर्डी फाटा वडनेर रोडवरील वरुण आर्मी हेगलाईन मार्गे देवळाली कॅम्पला येताना वडनेर रोड भोलेनाथ मंदिर जवळील सिंगापूर आर्मी गेट समोर एक बिबट्या त्यांना आडवा आला. बिबट्याची धडक गाडीला बसली अन् त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. कारण नुकतीच बिबट्याने एका लहान मुलाला ठार केल्याची घटना त्यांच्या डोळ्यासमोर आली.

माता न तू वैरिणी ! नवऱ्यासोबत भांडल्यावर बायकोचे दीड वर्षाच्या चिमुकल्यासोबत भयंकर कृत्य

पण चारचाकी वाहनाला धडक बसताच बिबट्याने तेथून धूम ठोकली.  सुदैवाने त्यांचा जीव बचावला. या घटनेमुळे याठिकाणी बिबट्याचा वावर अजूनही असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group