दैनिक भ्रमर : मनमाड नजीक दहेगाव शिवारात शनिवारी मध्यरात्री प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून येथे प्राथमिक उपचार करून सदर महिलेला पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर दहेगाव मनमाड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मनमाडसह परिसरात पुन्हा बिबट्या आल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.मात्र वन विभागाने तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन महिलेवर बिबट्याने हल्ला केलेला नसून मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले व वन विभागाने आवश्यक ती उपाय योजना त्या ठिकाणी केली आहे.
हे ही वाचा...
दरम्यान याबाबतची माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मनमाड नजीक असलेल्या दहेगाव शिवारातील कांद्याच्या खळ्यावर भडांगे कुटुंबीय राखणदारीचे काम करत होते. मध्यरात्रीच्या सुमाराला हे भडांगे कुटुंब झोपेत असताना हीच प्राण्याने नर्मदाबाई यशवंत भडांगे वय अंदाजे ५८ ते ६० यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आरडा ओरड केल्यानंतर सदर प्राणाने पळ काढला. त्यामुळे ही महिला बालम बाल बचावली. पण सदर महिलेच्या चेहऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यांना तात्काळ नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे दहेगाव मनमाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर बिबट्याने हल्ला केल्याच्या प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.
हे ही वाचा...
दरम्यान चांदवड वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन परिमंडल अधिकारी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी सदर घटना घडली तेथे आज शनिवारी सकाळी हजेरी लावली व बारकाईने पाहणी केली. या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे का याची शहानिशा देखील केली. पण बिबट्या असल्याचे निदर्शनास आले नाहीत, असे कोणते लक्षणही दिसले नाही. सदर महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. बिबट्याने नव्हे रात्रीच्या वेळी अंधारामुळे कदाचित हा प्रकार लक्षात आलेला नसावा त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्व घटनेची पाहणी करून येथे बिबट्या नव्हे तर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे तिथील नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले.
हे ही वाचा...
तसेच या संदर्भात कोणती दक्षता घ्यावी,काळजी घ्यावी याबद्दल परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करून सूचनाही दिलेल्या आहेत. बिबट्याचा वावर निदर्शनास आले नसल्याने परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आलेला नाही. पण बिबट्या आढळून आल्यास कोणती काळजी घ्यावी त्याच पद्धतीने दहेगाव मनमाड परिसरात घटनास्थळी उपाय योजना करण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वन परिमंडल अधिकारी वैभव गायकवाड,प्रवीण चव्हाण, अशोक शिंदे,भरत वाघ आदीं वन विभाग कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहानिशा, बिबट्याचा वावर नाही
दहेगाव-मनमाड परिसरात झालेल्या घटनेबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. बिबट्याचा वावर आढळून येईल असे कोणतेही सबळ घटक दिसून आलेले नाही. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्याने हल्ला केला असावा. संबंधित नागरिकांना याबाबत कोणती दक्षता घ्यावी याच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्याचे लक्षणे आढळून आले नाही त्यामुळे पिंजरा लावलेला नाही.
वैभव गायकवाड,वन परिमंडल अधिकारी, चांदवड