"....म्हणून वाचला रेल्वे प्रवाशाचा जीव" ; नेमकं काय घडलं ?
img
Dipali Ghadwaje
मनमाड : रेल्वे ड्रायव्हरने दाखवलेल्या तत्परतेने आज एका प्रवाशाचा  जीव वाचला आहे. घडलं असं की , मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले. 

त्यामुळे  रेल्वे  ड्रायव्हर आणि गार्डने रेल्वे थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशाला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रेल्वे ड्रायव्हरने दाखवलेल्या माणुसकीने आज एका  प्रवाशाचा जीव  वाचल्याने या गोष्टीची सर्वत्र चर्चा होतेय. 
manmad |
इतर बातम्या
Join Whatsapp Group