मनमाड शहरातून जाणारे इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना तसेच वाहन चालकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे सोमवारी सकाळी मालेगावहून येवल्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक शहरातील सार्वजनिक अमरधाम नजीक पलटी झाला.यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून अपघाताची माहिती मिळतात मनमाड पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले.मात्र या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवर नेहमीच वाहतूक कोंडी झाल्याने अनेक अपघात देखील झाले आहेत.या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाले असून छोटे मोठे अपघात देखील मोठ्या प्रमाणात घडल्याने अनेक जण जखमी देखील झाले आहेत.
सोमवारी सकाळी मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावरील शहरातील सार्वजनिक अमरधाम असलेल्या ठिकाणी मालेगावहून मनमाड कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालक हा गंभीर जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल. स्थानिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढून उपचारासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात हे मनमाडकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने रोज वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.याशिवाय रेल्वे ओव्हरब्रिज हा अतिशय छोटा असल्याने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व रोज अपघात देखील होतात. हा महामार्ग मनमाड शहरातून जातो. हा शहराच्या बाहेरून यावा. रिंगरोड किंवा बायपास तयार करावा अन्यथा या महामार्गाची रुंदी वाढवून चौपदरीकरण करावे अशी मागणी मनमाडकर जनतेकडून सातत्याने करण्यात येत आहे.मात्र यावर काही तोडगा निघत नसल्याने मनमाडकारांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर धुळे - संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय नांदगाव ते संभाजीनगर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या महामार्गावरील वाहतूक मनमाड शहरातून वळविण्यात आली आहे. यामुळे या महामार्गावर जास्त वाहतूक वाढली आहे. नांदगाव-संभाजीनगर हा महामार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करावा, जेणेकरून मनमाड - इंदूर महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात कमी होईल,अशी मागणी सर्वसामान्य मनमाडकरांकडून करण्यात येत आहे.