इंधन वाहिनी पाईपलाईनला गळती होऊन आग लागते आणि सर्वत्र धावपळ सुरू तेव्हा...
इंधन वाहिनी पाईपलाईनला गळती होऊन आग लागते आणि सर्वत्र धावपळ सुरू तेव्हा...
img
दैनिक भ्रमर


मनमाड (प्रतिनिधी) : शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर पुणे - इंदौर राष्ट्रीय महामार्ग नजिक असलेल्या जळगाव निंबायती शिवारातील शेतातून जाणाऱ्या इंधन वाहिनीला अचानक गळती होऊन आग लागते अन् धोक्याचा भोंगा वाजतो. सर्वत्र धावपळ सुरू होते.

अग्निशमन दल व रुग्णवाहिका वाहने सायरन वाजवत गावात पोहचतात यंत्रणेची धावपळ सुरू होते. गावातून जाणाऱ्या तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र ही आग नसून इंधन वाहून नेणाऱ्या वाहिनीला अचानक गळती होऊन आग लागल्यानंतर नियंत्रण कसे मिळवावे यासाठी ऑफ साईट मॉक ड्रिल म्हणजेच प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शेतात पाण्याची पाईपलाईन करण्यासाठी खोदतांना इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते.आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे चित्तथरारक प्रत्याक्षिके यावेळी सादर करण्यात आले. शहरा पासून जवळच असलेल्या पुणे - इंदोर राष्ट्रीय महामार्ग नजीक जळगाव निंबायती शिवारात गुजरात येथून मनमाड-पानेवाडी इंधन कंपन्याना पाईपलाईनद्वारे इंधन पुरवठा होतो. जळगाव निंबायती येथे जमिनीखालून ही पाईपलाईन जाते त्याच ठिकाणी ही सुरक्षा प्रात्यक्षिके झाली.

जमिनीखालून ही पाईपलाईन गेली आहे. पण शेतात पाण्याचे पाईपलाईनसाठी खोदकाम करत असतांचा इंधन वाहिनी पाईपलाईनला धक्का लावून ही पाईपलाईन फुटली आणि क्षणार्धात पाण्याचा फवारा उडावा तसे डिझेल बाहेर येऊ लागले. ग्रामस्थांनी हि माहिती प्रशासनला कळवली. सर्वच धोक्याचे सायरन वाजवण्यात आले.

पाईपलाईन गस्तीपथक आपल्या साधन सामुग्रीसह शोध मोहिमेला निघाले. अतिशय वेगात हे पथक घटनास्थळी पोहचले. त्या पोठोपाठ कंपनीचे सुरक्षा रक्षक, यातायात पथक, अनीशमन दल आदी खादगावला दाखल झाले, सर्वत्र धोक्याचा इशारा देण्यात आला.पाईपलाईनमधून होणारी इंधन वाहतूक तात्काळ थांबवली. पथकाने घटनास्थळी येऊन लिकेज झालेल्या पाईपला खुटी ठोकली. नंतर सर्वत्र पसरलेले डिझेल संकलीत केले. पण हे करत असतांना अचानक इंधन पाईपलाईमधून भडका उडाला, आगीचे लोळ उठू लागले, सुरक्षा रक्षकांनी चारही बाजुंनी सुरुवातीला फोमची फवारणी केली.

त्यानंतर पाण्याचे फवारे चहू बाजुचे सोडण्यात आले. आणि २५ मिनिटात इंधनाची गळती बंद होऊन आगही नियंत्रणात आली. अॅल्युमिनियम कोट परिधान केलेल्या जवानाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन 'सब कुछ ओके' असल्याचा सिग्नल दिला. आणि तब्बल २५ मिनिटे श्वास रोखून धरणारी चित्त थरारक आणि जीव घेणी प्रात्यक्षिके संपुष्टात आली.यावेळी परिसरातील ग्रामस्थ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पानेवाडी मनमाड कंपनी तर्फे जळगाव निंबायती तालुका मालेगाव येथे या ऑफ साईटवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये इंडियन ऑइल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच पश्चिमेक क्षेत्र पाईपलाईनचे अधिकारी, कर्मचारी सुरक्षा रक्षक, रेस्क्यू टीम, ऑक्झिलरी टीम, फायर कॉम्बॅक्ट टीम तसेच मनमाड नगरपालिकेचे अग्नीशामक पथक, कंपनीचे यातायात पथक, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णवाहिका आदि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group