मनमाड - मालेगाव रोडवर  बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात , ट्रॅक्टर चालक ठार, बसमधील 8 प्रवासी जखमी
मनमाड - मालेगाव रोडवर बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात , ट्रॅक्टर चालक ठार, बसमधील 8 प्रवासी जखमी
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) : मनमाड - मालेगाव रोडवरील चोंढी घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बसने कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला असून, तर बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत.

ही बस मनमाडहुन नंदुरबारकड़े  जात असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बसने दिलेल्या जबर धडकेने ट्रॅक्टर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला काही फूट अंतरावर लांब फेकला गेल्याने रस्त्यावर कांदेच-कांदे पसरले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group