अतिआवश्यक सेवा वगळता मनमाडला कडकडीत बंद
अतिआवश्यक सेवा वगळता मनमाडला कडकडीत बंद
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना नाईलाजाने पुन्हा एकदा उपोषणास बसावे लागले आहे.

त्यांना सक्रिय पाठिंबा व समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज मनमाड बंदचे आवाहन करण्यात आले. त्याच अनुषंगाने मनमाडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले असून संपूर्ण बाजारपेठ अतिआवश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group