पोलिसी कारवाईची भिती दाखवून सेवानिवृत्त शिक्षकाची २४ लाख रुपयांची फसवणूक ...
पोलिसी कारवाईची भिती दाखवून सेवानिवृत्त शिक्षकाची २४ लाख रुपयांची फसवणूक ...
img
दैनिक भ्रमर
मनमाड : तालुका प्रतिनिधी : तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल अशी भीती दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापू धनाजी बोरसे  ( रा.नांदगाव ) यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, हा प्रकार
(दि.24) फेब्रुवारी  रोजी घडला आहे. तक्रारदार यांच्या मोबाईल  सायबर चोरट्यांनी फोन केला.

आम्ही नरेश गोयल यांच्या फ्रॉड केसमध्ये धाड टाकली असून त्यामध्ये तुमचे कॅनरा बँकेचे एटीएम सापडले असून त्यावर 68 लाख रु. जमा आहेत. ते 68  लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे आले आणि ही रक्कम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, याची आम्हाला चौकशी करायची आहे.

यावेळी मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले की सदर रक्कम सेवानिवृत्तीची ग्रॅच्युइटी, पेन्शन विक्री, भविष्य निर्वाह निधी याची असून यातील काही रक्कम मी माझ्या वैयक्तिक आणि कुटुंबाच्या कामासाठी खर्चली देखील आहे.तसेच, मी आयकरही भरतो. त्यावर त्यांनी, 'आम्हाला फक्त चौकशी करायची असून तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय पाठवतो, तुम्ही तुमच्या बँकेचे स्टेटमेंट त्यावर पाठवा,' असे सांगितले.

बोरसे यांनी त्यांचे बँक स्टेटमेंट त्यांना पाठवले असता काही तासांनी त्यांना व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल आला. त्यात कुलाबा नाव असलेले पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व्यक्ती युनिफॉर्ममध्ये दाखवण्यात आली.

व्हिडिओ कॉल दरम्यान सांगण्यात आले की, तुमच्या स्टेटमेंट, पासबुकची चौकशी केली असून तुमच्या खात्यावर असलेल्या रकमेची आम्हाला करायची आहे. चौकशी ही रक्कम आरटीजीएसद्वारे आम्हाला पाठवा. आम्ही चौकशी करून तुम्हाला ती परत करू. ही माहिती गोपनीय असून याबद्दल घरातील   आणि कोणालाही सांगू नका. बोरसे यांनी रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवण्यास नकार दिला असता.

त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली. मग त्यांना आरबीआयच्या नावाने एक इंग्रजी भाषेतील पीडीएफ नोटीस पाठवण्यात आली. त्यावर बराच दस्तऐवज लिहिलेला होता. बोरसे यांना यावर आरबीआयचा खाते क्रमांक असून त्यावर लिहिलेली रक्कम आरटीजीएस करा, नाहीतर तुम्हाला अटक करण्यात येईल, असा दम देण्यात आला.

अटक होण्याच्या भीतीपोटी मोबाईलधारकाने सांगितलेल्या विविध खात्यांवर बोरसे यांनी क्रमाक्रमाने 24 लाख 10 हजार इतकी रक्कम पाठवली.आता चौकशी पूर्ण झाली असेल तर माझी रक्कम परत करा, अशी मागणी बोरसे यांनी सुरू केली असता रक्कम परत न करता आणखी रकमेची मागणी करण्यात येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे बोरसे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ सायबर विभागाला तक्रार केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group