मनमाड रेल्वे स्थानकावर बॉम्ब व दहशतवादी शोधण्याचा थरार
मनमाड रेल्वे स्थानकावर बॉम्ब व दहशतवादी शोधण्याचा थरार
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- आयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून, देशातील महत्वपूर्ण स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल करण्यात आले.

पोलीस,रेल्वे सुरक्षा बल,श्वान पथक,बॉम्ब शोधक नाशक व पथकाकडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या सर्वसाधारण प्रतीक्षालयात एका दहशतवाद्याने बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे माहिती मिळते.


सुरक्षा यंत्रणासह रुग्णवाहिका, अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात येते.बॉम्ब शोधून सुरक्षित निकामी करून ब्लॅक कमांडोमार्फत दहशतवाद्याला जेरबंद  करण्यात आल्याचा मॉकड्रिलचा थरार प्रवाशांनसह नागरीकांनी अनुभवला...
manmad |
इतर बातम्या
Join Whatsapp Group