नांदगाव मतदार संघात चर्चा फक्त नाम साधर्म्य असलेल्या डमी उमेदवारांचीच...
नांदगाव मतदार संघात चर्चा फक्त नाम साधर्म्य असलेल्या डमी उमेदवारांचीच...
img
दैनिक भ्रमर
मनमाड प्रतिनिधी : नैवेद्या बिदरी : गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली या लोकसभे निवडणुकीमध्ये नाशिकच्या दिंडोरी मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे हे भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पराभूत करून निवडून देखील आले मात्र दिंडोरी मतदार संघात महायुतीकडून खेळी करत भास्कर मुरलीधर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य डमी उमेदवार भास्कर बाबुराव भगरे उभे राहिले डमी उमेदवाराला चक्क एक लाख मतांन पेक्षाही अधिक मते देखील मिळाल्याने भगरे पॅटर्न जिल्हा सह राज्यात गाजला...सध्या विधानसभेचे रंणधुमळ सुरू असून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार सुहास द्वारकानाथ कांदे यांच्या विरोधात धाराशिव येथील नाम साधर्म्य असलेले डमी उमेदवार सुहास बापूराव कांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांच्या विरोधात दिंडोरी येथील डमी उमेदवार गणेश काशिनाथ धात्रक यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने मतदारसंघात भगरे पॅटर्नची चर्चेला उधाण आले आहे.

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे विरुद्ध सुहास बापूराव कांदे अशी लढत पहायला मिळणार आहे.तर दुसरी कडे शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्या विरुद्ध गणेश काशिनाथ धात्रक असे नामसाधर्म्या उमेदवार उभे आहे.या निवडणुकीत नामसाधर्म्या मुळे सुहास कांदे व गणेश धात्रक यांच्यात अडचण वाढण्याची शक्यता आहे.

समीर भुजबळ यांनी नावात नामसाधर्म्या असलेला उमेदवार दिला असल्याचा आरोप शिवसेनेच्या कांदेनी केला आहे.नाम साधर्म्य असल्याचा गैरफायदा घेत मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून विविध शक्कल लढविली जात आहे. कालच विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध डमी सुहास बापूराव कांदे या उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळाने डमी उमेदवार याला स्वतः समीर भुजबळ हे पोलीस सुरक्षात घेऊन जातांना पहावयास मिळाले.

दरम्यान डमी उमेदवारांमुळे तहसील आवारात तहसील कार्यालयात कांदे समर्थक व भुजबळ समर्थकांमध्ये राडा झाल्याचे पाहावयास मिळालेया राड्यामुळे तहसील कार्यालयात छावणीचे स्वरूप आले असून डमी उमेदवारांना पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने मतदार संघात विविध चर्चेला उधाण आले असून या डमी उमेदवारांचा फटका कोणत्या उमेदवारांना बसेल हे निवडणुकीनंतरच कळेल... 

इतर बातम्या
Join Whatsapp Group