बेपत्ता तरुणाचा मृतदेह बंधाऱ्यात सापडल्याने खळबळ; आत्महत्या की हत्या हे मात्र गुलदस्त्यात
बेपत्ता तरुणाचा मृतदेह बंधाऱ्यात सापडल्याने खळबळ; आत्महत्या की हत्या हे मात्र गुलदस्त्यात
img
वैष्णवी सांगळे
मनमाड (प्रतिनिधी) :- गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह महादेव बंधाऱ्यात सापडल्याने मनमाड शहरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की नियोजित हत्या, यावरून अनेक तर्क-वितर्क सुरू असून शहरात चर्चेला उधाण आले आहे.

शहरातील भारत नगर परिसरात राहणारा ओम धनवटे नावाचा तरुण रविवारी (ता. ३१ ऑगस्ट) सकाळी नेहमीप्रमाणे एका डिजिटल प्रिंटिंग दुकानात कामावर गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. यानंतर त्याच्या आई व मित्रांनी परिसरात शोध घेतला, पण काहीही सुराग न लागल्याने मनमाड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, मंगळवारी दुपारी रेल्वे प्रशासनाला पाणीपुरवठा करणाऱ्या महादेव बंधाऱ्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

ओम धनवटे याचा कुटुंबात आई व लहान भाऊ असा परिवार असून, तो कोणत्याही व्यसनापासून दूर होता, असे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने सांगितले. विशेष म्हणजे, रविवारी त्याचा पगारही झाला होता, आणि शेवटच्या फोन पे व्यवहारात ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे पेमेंट केल्याची नोंद दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांकडून मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. खून की आत्महत्या? – याचे उत्तर अद्याप मिळाले नसून, पोलीस तपास सुरू आहे.
manmad |
इतर बातम्या
प्रवासी

Join Whatsapp Group