अखेर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले
अखेर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- संपुर्ण राज्यामध्ये पाणी टंचाईसाठी प्रसिध्द असणाऱ्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण परतीच्या पावसामुळे आज सायंकाळी ओव्हरफ्लो झाले आहे. याही वर्षी वागदर्डी धरण परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ६८.३ फुट धरण भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. तब्बल दोन वर्षानंतर धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाणीचे चिंता मिटली आहे.


शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने ६८.३ फुट धरण भरले असून ते ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे मनमाडकर नागरिकांची पाणी टंचाई दूर झाली आहे. मनमाडकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मनमाडकरांचा दर वर्षी अत्यंत जीव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न हा धरण ओव्हरफ्लो झाल्याने मार्गी लागला आहे.

मनमाड शहराला सध्या २० ते २२  दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. आता वागदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने किमान सहा महिने हे पाणी शहराला पुरेल व पुढील काळात मनमाड शहराला पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही.  त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असुन नगरपरिषद प्रशासनाने किमान दहा दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी मनमाडकर करीत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरले असून शहराचा पाणीप्रश्न यंदाही निकाली निघाला आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरले, तर भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. नगरपरिषद प्रशासनाकडून  शहराला केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातील दिवस कमी करण्याचे प्रयत्न नगरपरिषदेकडून सुरू असुन पाणी पुरवठ्यात येणाऱ्या त्रुटी देखील प्रशासनातर्फे दूर करू, असे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group