रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करणारा ३० वर्षीय तरुण ताब्यात
रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करणारा ३० वर्षीय तरुण ताब्यात
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरले असल्यामुळे आरामदायी व स्वस्त प्रवासाकरिता सर्वसामान्य नागरिक प्रथम प्राधान्य रेल्वेलाच देतो. 


मात्र ऐन प्रवासादरम्यान आरक्षित तिकीट भेटत नसल्यामुळे प्रवासी आरक्षित तिकीट प्राप्त करण्यासाठी काहिही करतो याचाच फायदा रेल्वे तिकीटाचे काळाबाजार करणाऱ्यांना होतो. रेल्वे तिकीटाचे काळाबाजार करणाऱ्या ३० वर्षीय तरूणाला रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे रेल्वे तिकीटांचे काळाबाजार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरातील शाकुंतल मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय मुजाहिद जावेद खान हा तरुण अवैध्यरित्या रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना कळली.

तत्काळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार देसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाचे पथक तयार करून घटनास्थळी दाखल होत सापळा रचून मुजाहिद जावेद खान या तरुणाला ताब्यात घेतले.मुजाहिद खान याच्याकडे दोन मोबाईल सापडले असून या मोबाईल मधील डेटा आणि वापर करते तसेच आढळून आलेल्या ३५ ई- तिकिटाबद्दल चौकशी केली.

मुजाहिद खान याने सांगितले की, मोबाईल मधील एक आयडी माझा असून बाकीचे जवळपास १५ आयडी वेगवेगळ्या नावाने म्हणजेच फेक असून त्याचे पासवर्ड मी जतन केले आहे. जास्तीचे पैसे घेऊन गरजू प्रवाशांना तिकीट काढून देत असल्याचे मुजाहिद खान यांनी कबूल केले. चौकशीत त्याने वैयक्तिक यूजर आयडी बनवून मोबाईलच्या माध्यमातून गरजू प्रवाशांना किरकोळ पैसे घेऊन तिकिटे देत असल्याचे कबूल केले.

याच प्रकरणी मुजाहिद खान याच्याकडून २ मोबाईल,६ ई - तिकिट आणि जूने २९ तिकिट असे एकूण ३५ तिकीट असा १ लाख २ हजार ७५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक उपनिरीक्षक निलेश सोमवंशी, किशोर चौधरी, बी.बी.श्रीवास, विठ्ठल नागरे आदि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रवाशांनीरेल्वेचे तिकीट काढताना अनुचित प्रकार तर नाही ना याची खात्री करावी, तसेच काही अनुसूचित प्रकार लक्षात आल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधावा. - संदिपकुमार देसवाल, निरीक्षक रे.सु.ब, मनमाड

उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळी सण किंवा आणखी काही. लांबच्या प्रवासाचे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढायला लागलो की, सगळ्या रेल्वेंचे बुकिंग फुल्ल आणि आपण कायमच वेटिंग लिस्टमध्ये असतो. कोणीतरी सल्ला देतो, ‘अरे, एजंटकडून ब्लॅकने तिकीट मिळेल. घेऊन टाक. नाहीतर प्रवासाच्या प्लॅनवर फुली मार’. मग प्रश्न पडतो आपल्या नशिबी नाही ते तिकीट एजंटला मिळते कसे, याचं उत्तर दडलंय दलालांचं अवाढव्य नेटवर्क आणि काळ्याबाजारात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group