मनमाड (नैवेद्या बिदरी) :- प्रवासात गर्भवती महिला अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सक्रिय भूमिका बजावते.मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमधून प्रवास करताना मनमाड स्थानकातून गाडी गेल्यानंतर अचानक एका गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या.
दरम्यान गाडीतील महिला सहप्रवासी आणि तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धावत्या गाडीत महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटन घडली.
याबाबत माहिती अशी की,गाडी क्रमांक १२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्सप्रेस मधिल बी -१२ मधुन गर्भवती महिला हाफिज शेख हे प्रयागराज कडे प्रवास करीत असताना मनमाड स्थानक सुटल्यानंतर या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. मनमाड ते बऱ्हाणपूर स्थानका दरम्यान गाडीतील महिला सहप्रवासी आणि तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धावत्या गाडीत महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.
गाडीतील तपासणी अधिकाऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवत थांबा नसलेल्या बराणपुर रेल्वे स्थानकात आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आई हाफिज शेख आणि नवजात अर्भकाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रसंगात गाडीतील एक महिला सह प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी नंद बिहारी मीणा, आलोक शर्मा, राजकरण यादव, आणि इंद्र कुमार मीणा आदींनी सहभाग घेतला असून धावत्या रेल्वे गाडीत सुखरूप प्रसूती केल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.