डॉ. राठींवर हल्ला करणाऱ्या राजेंद्र मोरेला
डॉ. राठींवर हल्ला करणाऱ्या राजेंद्र मोरेला "या" तारखेपर्यंत पोलीस कोठडी
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- शुक्रवारी रात्री सुयोग हॉस्पिटलचे संचालक कैलास राठी यांच्यावर राजेंद्र मोरेने प्राणघातक हल्ला करत कोयत्याने 19 वार केले होते.

या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉ. राठी यांची प्रकृती चिंताजनक आहे. काल सायंकाळी पंचवटी पोलिसांनी सापळा रचून भावाला भेटण्यासाठी आलेल्या राजेंद्र मोरेला शिताफीने अटक केली.

डॉ. राठी यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मोरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मोरेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Join Whatsapp Group