मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात;
मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात; "या" आहेत तेथील काही समस्या
img
दैनिक भ्रमर
मनमाड : संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्या चा विषय गाजत असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व काही ठीक असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र गर्भवती महिलांना रक्त वाढीसाठी देण्यात येणारे गोळ्या गेल्या अनेक महिन्यापासून संपले असल्याची माहिती सूत्रांकडून हाती लागली आहे. या ठिकाणी 108 ॲम्बुलन्स समस्या गेल्या अनेक दिवसापासून आहे मात्र रुग्णांना उपचार वेळेवर मिळत नाही.

रुग्णवाहिका मिळत नसल्याने मालेगाव किंवा इतर ठिकाणी रुग्ण उशिरा पोहोचतो आणि अशा परिस्थितीत मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय पिण्याची पाणी नाही तर दुसरीकडे घाणीचे साम्राज्य देखील रुग्णालय परिसरात पसरले आहे. तसेच महिलांच्या स्वच्छता गृहेला सदैव कुलुप असल्याने प्रसाधानासाठी कुठे जावे हा प्रश्न महिलांना पडलेला आहे. मात्र याबाबत प्रशासनातील अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group