दिंडोरी (प्रतिनिधी) :- दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे (वय 15) हा इयत्ता नववीत शिकतो. समाधान त्याच्या मित्रा बरोबर तेथील एका वाघदेव नगर वस्ती जवळ असलेल्या गावतळ्यात पोहोण्यासाठी गेला असता समाधानला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत.