पिस्तुलचा धाक दाखवत डॉक्टरला मारहाण; 2 लाखांच्या रोकडसह कार पळवली
पिस्तुलचा धाक दाखवत डॉक्टरला मारहाण; 2 लाखांच्या रोकडसह कार पळवली
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (वार्ताहर) :- टाकळी विंचूरला दोन मोटरसायकलस्वारांनी  एका डॉक्टरची कार अडवुन पिस्तुलचा धाक दाखवून रोख रकमेसह अल्टो कार घेऊन पलायन केल्याची घटना घडली. 

लासलगाव पोलीस ठाण्यात डॉ. ढोबळे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले की, अल्टो कार (क्र. एम. एच. 15 एफ. टी. 3962) ने  विंचुर एमआयडीसी येथे डॉ. ढोबळे हे कामानिमित्त निघाले होते. ते विंचुर एमआयडीसी पार्क येथे जाण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना अचानक एक मोटारसायकल  कारच्या समोर आल्याने  त्यांनी गाडीचा वेग कमी केला.

त्यानंतर दुचाकीवरील दोघांनी  खाली उतरुन गाडीजवळ आले.  त्यातील एकाने त्याचे हातातील पिस्तोलसारखे हत्यार डॉ.विनोद ढोबळे यांच्या डोक्याला लावुन गाडी थांबवली आणि एकाने जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडुन डॉक्टरला बाजुच्या सीटवर ढकलुन दिले. त्यानंतर दोघांनी डॉ. ढोबळे यांना मारहाण करुन त्यांच्याजवळील 2,19,000 रुपये व 50,000 रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची अल्टो कार या दोघा चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेली. 

एकमेकाशी शाहरुख आणि गणेश असे नावाने बोलणारे अनोळखी चोरट्यांनी ही लूट केली आहे. अखेर प्रयत्न करून डॉ. ढोबळे यांनी आपली सुटका करुन घेतली. चालत अंदरसूल गावाकडे चालत  भिलाटी भागात दोन मुले दिसली तेव्हा  त्यांना सर्व प्रकार सांगुन पोलिसांना कळविण्याबाबत विनंती केली असता त्यांनी पोलिसांना फोन लावुन ही माहिती कळवली. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात घेऊन आले.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्ग खाली लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस करीत 
आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group